Tata Sierra: कारप्रेमींसाठी गुड न्यूज! टाटा सिएराची लाँच डेट जवळ, स्टायलिश लुक आणि नवे फीचर्ससह येणार

WhatsApp Group

मुंबई | १८ मे २०२५ — टाटा मोटर्सने Tata New Sierra launch इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये पहिल्यांदाच आपल्या आयकॉनिक एसयूव्हीचे नविन रूपात पुनरागमन करत नवीन टाटा सिएराचे अनावरण केले होते. त्यानंतर पासूनच ग्राहकांमध्ये या कारबाबत प्रचंड उत्सुकता आहे. आता समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, ही कार १५ ऑगस्ट २०२५ रोजी अधिकृतपणे लाँच केली जाऊ शकते.

इलेक्ट्रिक, पेट्रोल आणि डिझेल — तिन्ही पर्याय उपलब्ध

नवीन सिएरा ही टाटाच्या Gen2 EV प्लॅटफॉर्मवर आधारित असून, EV, पेट्रोल आणि डिझेल अशा तिन्ही व्हेरियंट्समध्ये विक्रीस उपलब्ध असणार आहे. यामुळे विविध ग्राहकवर्गांना त्यांच्या गरजेनुसार पर्याय निवडण्याची मोकळीक मिळणार आहे. यावेळी सिएराचे मॉडेल पूर्वीच्या तुलनेत अधिक आधुनिक डिझाइन आणि प्रगत फीचर्ससह सादर होणार आहे.

फीचर्स — लक्झरी आणि तंत्रज्ञानाचा संगम

स्रोतांच्या माहितीनुसार, नवीन सिएरामध्ये खालील प्रगत वैशिष्ट्यांचा समावेश असू शकतो:

  • प्रीमियम साउंड सिस्टिम

  • पॅनोरॅमिक सनरूफ

  • वायरलेस फोन चार्जर

  • अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्ट

  • हवेशीर फ्रंट सीट्स

  • तीन १२.३-इंच स्क्रीन – डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सेंट्रल टचस्क्रीन, आणि पॅसेंजर साइड टचस्क्रीन

सुरक्षा — अत्याधुनिक टेक्नॉलॉजीसह सज्ज

सिएरा मध्ये सुरक्षेचाही विशेष विचार करण्यात आला असून खालील फीचर्स मिळू शकतात:

  • ६ एअरबॅग्ज

  • अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS)

  • ३६० डिग्री कॅमेरा

  • इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC)

  • लेव्हल २ ADAS (Advanced Driver Assistance System)

इंजिन, पॉवर आणि ड्राइव्ह तंत्रज्ञान

नवीन सिएरा मध्ये १.५ लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन दिले जाणार असून ते १७० hp पॉवर आणि २८० Nm टॉर्क निर्माण करेल. याशिवाय, ग्राहकांसाठी २.० लिटर डिझेल इंजिनचाही पर्याय उपलब्ध असेल. सिएरा मध्ये ६-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय असतील. शिवाय, ही SUV AWD (ऑल व्हील ड्राइव्ह) प्रणालीसह देखील उपलब्ध होऊ शकते.

अपेक्षित किंमत 

नवीन टाटा सिएरा ची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹१०.५० लाखांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. तिची स्पर्धा देशांतर्गत SUV सेगमेंटमधील इतर लोकप्रिय गाड्यांशी होणार आहे.

नवीन सिएरा टाटाच्या SUV पोर्टफोलिओमध्ये एक महत्त्वाची भर ठरणार आहे. १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिचे अनावरण झाले, तर ते ब्रँडसाठी एक मोठा भावनिक आणि बाजारपेठेतील क्षण असू शकतो.