IPL 2020 : 9 संघांच्या कर्णधारांची घोषणा, ‘या’ संघाच्या कर्णधाराचा अद्याप पत्ता नाही!

WhatsApp Group

इंडियन प्रीमियर लीगचा 15वा सीझन म्हणजेच IPL 2022 पुढच्या महिन्यात 26 मार्चपासून सुरू होणार आहे.  यंदा IPL मध्ये 10 संघ खेळताना दिसणार आहेत. या 10 पैकी 9 संघांच्या कर्णधारांची घोषणा करण्यात आली आहे. आता फक्त एका संघाच्या कर्णधाराची घोषणा व्हायची आहे. सोमवारी 28 फेब्रुवारीला पंजाब किंग्जनेही त्यांच्या संघाच्या कर्णधाराची घोषणा केली आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीने अद्याप त्यांच्या कर्णधाराची घोषणा केलेली नाही.

आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत एकच परदेशी कर्णधार पाहायला मिळाला आहे. सनरायझर्स हैदराबादने केन विल्यमसनला त्यांच्या संघाच्या कर्णधारपदी कायम ठेवले आहे. बहुतांश संघाचे कर्णधार हे भारतीय संघातील अव्वल खेळाडू आहेत, जे भारतीय संघासाठी सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहेत.

सर्वात यशस्वी IPL फ्रेंचाइजी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आहे, तर चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीच्या हातात आहे. दिल्ली कॅपिटल्सची कमान पुन्हा ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे, तर राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनवर पुन्हा विश्वास दाखवला आहे. हैदरबादाचे नेतृत्व केन विल्यमसन करेल.

त्याच वेळी, आयपीएल 2022 च्या मेगा लिलावानंतर, लखनऊ सुपर जायंट्सने त्यांच्या संघाची कमान केएल राहुलकडे सोपवली, तर गुजरात टायटन्सने कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे दिली. याशिवाय श्रेयस अय्यरला आयपीएल लिलावात कोलकाता नाईट रायडर्स अर्थात केकेआरने विकत घेतले आणि त्याची संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर आता पंजाब किंग्जने मयंक अग्रवालला कर्णधार बनवले आहे. आता फक्त आरसीबीला त्यांच्या कर्णधारपदाची घोषणा करायची आहे, ज्यांच्या शर्यतीत ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिस आहेत.

  • IPL 2022 च्या कर्णधारांची नावे

  • चेन्नई सुपर किंग्ज – एमएस धोनी
  • मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा
  • दिल्ली कॅपिटल्स – ऋषभ पंत
  • कोलकाता नाईट रायडर्स – श्रेयस अय्यर
  • राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन
  • सनरायझर्स हैदराबाद – केन विल्यमसन
  • लखनौ सुपर जायंट्स – केएल राहुल
  • गुजरात टायटन्स – हार्दिक पंड्या
  • पंजाब किंग्स – मयंक अग्रवाल
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – अजून घोषणा व्हायची आहे