आयपीएलची मोठी घोषणा, ‘या’ दिवशी होणार मेगा ऑक्शन!

WhatsApp Group

मुंबई – इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा ऑक्शनसाठी आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदाचा हा मेगा ऑक्शन 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगळुरूमध्ये होणार आहे. मंगळवारी आयपीएलच्या ट्विटर अकाऊंटवर मेगा ऑक्शनच्या तारखा जाहिर करण्यात आल्या आहेत.

इंडियन प्रीमियर लीगकडून अशी माहिती देण्यात आली आहे की “टाटा आयपीएल लिलाव 2022 जवळ आला आहे, मेगा लिलाव 12, 13 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता सुरू होईल.


शनिवार आणि रविवारी संपूर्ण दिवस खेळाडूंच्या बोलीत जाणार आहे. अशा परिस्थितीत चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी मेगा लिलाव होणार आहे, म्हणजे अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. आयपीएल मेगा लिलाव स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारवर आयोजित केला जाणार आहे.

पुण्यातून लाइट गायब, पाणी पुरवठाही विस्कळीत

IPL च्या मेगा लिलावात यंदा एकूण 590 खेळाडूंची बोली लागणार आहे, सुमारे 50 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. दोन डझनहून अधिक खेळाडूंची मूळ किंमत दीड कोटी तर अनेक खेळाडूंची किंमत एक कोटी ठेवण्यात आली आहे. याशिवाय 50 लाख, 30 लाख आणि 20 लाख या मूळ किमती असलेल्या खेळाडूंचाही समावेश आहे.

या आयपीएलमध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार असून, अहमदाबाद आणि लखनऊचे संघ यावेळी प्रथमच स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आयपीएलच्या मेगा लिलावासाठी प्रत्येक संघाला 90 कोटी रुपयांची पर्स देण्यात आली आहे. पण अनेक संघांनी खेळाडूंना कायम ठेवले आहे, त्यामुळे त्यांच्या किमती खाली आल्या आहेत. पंजाब हा असा संघ आहे, ज्यांच्या पर्समध्ये सर्वाधिक 72 कोटी रुपये आहेत.

हिजाबवरून वाद वाढला; कर्नाटकात 3 दिवस शाळा बंद, हायकोर्टात आज होणार सुनावणी