क्रीडा विश्वाला धक्का; या क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा

WhatsApp Group

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेशचा फलंदाज तमिम इक्बालने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तमीम इक्बालने गयाना येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 3-0 अशी मालिका जिंकल्यानंतर लगेचच T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. बांगलादेशने शेवटचा सामना चार गडी राखून जिंकून वेस्ट इंडिजचा सफाया केला, तमिमने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता.

तमिम इक्बालने त्याच्या अधिकृत फेसबुक पेजवर बांगला भाषेत एक छोटा संदेश पोस्ट केला, “मी आज T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती घेत आहे तुम्हा सर्वांचे आभार. असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

यावर्षी 27 जानेवारी रोजी तमीम इक्बाल म्हणाला, “माझे संपूर्ण लक्ष कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांवर असेल. आम्ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि 2023 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी तयारी करत आहोत. मी पुढील सहा महिन्यांत T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा विचार करत नाही.

2007 साली T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा डावखुरा फलंदाज तमीम इक्बाल मार्च 2020 मध्ये शेवटचा T20 सामना खेळला. त्याने या फॉरमॅटच्या 78 सामन्यांमध्ये एकूण 1758 धावा केल्या, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 103 धावा होती. त्याने 7 अर्धशतके आणि 24 च्या सरासरीने आणि 117 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटसह आपली T20 कारकीर्द पूर्ण केली. त्याने या फॉरमॅटमध्ये 189 चौकार आणि 45 षटकार मारले.