भूमी अभिलेख विभागाने तलाठी (गट-क) पदासाठी परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर केल्या आहेत. 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव दहा दिवस आधी कळविण्यात येईल.
तलाठ्याच्या 4466 जागांसाठी राज्यभरातून 11 लाख दहा हजार 53 उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना योग्य पद्धतीने परीक्षा देता यावी यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक परीक्षा केंद्र असणार आहे. ही परीक्षा तीन सत्रात घेतली जाणार आहे. वेळ सकाळी 9 ते 11, दुपारी 12.30 ते 2.30 आणि दुपारी 4.30 ते 6.30 अशी आहे. उमेदवारांना प्रवेशपत्रासह हजर होण्याच्या तीन दिवस अगोदर ऑनलाइन परीक्षेचे गाव आणि परीक्षा केंद्राची माहिती कळविण्यात येईल.
परीक्षेचे टप्पे कसे आहेत?
पहिला टप्पा – 17, 18, 19, 20, 21, 22 ऑगस्ट
दुसरा टप्पा – 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर
तिसरा टप्पा – 4 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर
23, 24, 25 ऑगस्ट आणि 2, 3, 7, 9, 11, 12 आणि 13 सप्टेंबर रोजी परीक्षा होणार नाहीत.