राज्य सरकारकडून महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी पदासाठीच्या तब्बल 4644 जागांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे.
या पदांसाठी होणार भरती
महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी (Talathi)
पात्रता
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार 12वी आणि पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- तसेच, उमेदवारांनी त्यांचे शिक्षण मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठातून पूर्ण केलेले असावे.
- उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचेही चांगले ज्ञान असावे.
- तसेच, उमेदवारांना राज्य सरकारने घोषित केलेल्या सर्व अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागतात.
वयोमार्यादा
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांचे वय 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असावे. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांना सूट दिली जाईल.
अशा प्रकारे अर्ज करा
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल.
- अर्ज सादर करण्यासाठी वेबसाईट – https://rfd.maharashtra.gov.in/
- अर्जदाराचे स्वतःचे जीमेल खाते आवश्यक आहे.
- अर्ज भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
- अर्जाची प्रत तुमच्या जीमेल खात्यावर प्राप्त होईल
- मुलाखतीच्या दिवशी छापील अर्जासह उपस्थित राहणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
- 10वी, 12वी आणि पदवी प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचे प्रमाणपत्र (उच्च जातीच्या उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधार कार्ड, परवाना)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2023