दुबईचा किंग कोण? आज भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडणार!

WhatsApp Group

दुबई – ज्या दिवसाची भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो दिवस आला असून प्रतीक्षेची वेळ संपली. आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी20 विश्वचषक 2021 मधील ‘सुपर 12’ फेरीचा सामना रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

आयसीसी वनडे आणि टी -20 विश्वचषकांबद्दल बोलायचे झाल्यास आजवर भारत-पाक 12 वेळा आमने सामने आले असून भारताने हे सर्वच्या सर्व 12 सामने जिंकले आहेत. 2007 मध्ये T20 विश्वचषक सुरू झाल्यापासून भारतीय संघाने पाचही सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत केले आहे.


भारत-पाकिस्तान आता सहाव्यांदा T20 विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत. T20 विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीत 2007 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना खेळला गेला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 141 धावा केल्या होत्या तर पाकिस्ताननेही 141 धावा करत सामना टाय केला. यानंतर ‘बॉल-आऊट’ च्या निकालावर भारताला विजयी घोषीत करण्यात आले होते.


आज ज्या मैदानावर सामना होणार आहे त्या दुबईच्या मैदानाची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी चांगली मानली जाते. या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमला मोठं आव्हान उभं करण्यात खेळपट्टीकडून साथ मिळते.

असे आहेत दोन्ही देशाचे संघ

पाकिस्तान बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हॅरिस रॉफ, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हैदर अली.

भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, इशान किशन, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर