
T20 World Cup: T20 विश्वचषक 2022 ला आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला आहे आणि त्याच दरम्यान टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. आशिया चषक 2022 मध्ये दुखापतीमुळे बाहेर पडलेला स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिकेसह संघात पुनरागमन केले, परंतु आता तो T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे.
पीटीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाठीच्या ताणामुळे बुमराह T20 विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेचा भाग होता, परंतु 28 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात पाठदुखीमुळे तो खेळला नाही. बुमराहला पाठीचा स्ट्रेस फ्रॅक्चर झाला आहे आणि यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेव्यतिरिक्त T20 विश्वचषकात सहभागी होऊ शकणार नाही. मोहम्मद शमीचा T20 विश्वचषक संघात स्टँडबाय म्हणून समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे बुमराहच्या जागी तो संघात सामील होऊ शकतो, तर मोहम्मद सिराजला स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत टाकले जाऊ शकते.
Jasprit Bumrah out of T20 World Cup with back stress fracture: BCCI sources
— Press Trust of India (@PTI_News) September 29, 2022
बुमराहचे अशाप्रकारे संघातून बाहेर पडणे हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पीटीआयने सांगितले की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे. मात्र, याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाहीय.
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा