T20 World Cup 2024: क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर

0
WhatsApp Group

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या उत्कृष्ट कामगिरीचे एक प्रमुख कारण म्हणजे सुनील नारायणची बॅट तसेच चेंडूची उत्कृष्ट कामगिरी. सुनील नारायणला या मोसमात कोलकाता संघासाठी सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळाली, ज्याचा पुरेपूर फायदा घेत त्याने आतापर्यंत 7 सामन्यात 40.86 च्या सरासरीने 286 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतक देखील समाविष्ट आहे. सुनीलची ही कामगिरी पाहून आगामी T20 विश्वचषक स्पर्धेसाठी त्याच्या वेस्ट इंडिज संघात पुनरागमन करण्याबाबत बरीच चर्चा झाली, जी आता सुनील नारायणने आपल्या एका सोशल मीडिया पोस्टद्वारे पूर्णपणे संपुष्टात आणली आहे. सुनील नारायणने स्पष्ट केले की, तो पुन्हा वेस्ट इंडिज संघाकडून खेळताना दिसणार नाही.

मी घेतलेल्या निर्णयावर ठाम आहे
सुनील नारायणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट करत लिहिले की, मला आनंद आहे की तुम्ही सर्व माझ्या अलीकडील कामगिरीने खूप खूश आहात. माझी कामगिरी पाहिल्यानंतर तुमच्यापैकी अनेकांनी मला माझा निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यास आणि टी-20 विश्वचषकात सहभागी होण्यास सांगितले. पण मी तुम्हा सर्वांना हे स्पष्ट करू इच्छितो की, मी त्यावेळी घेतलेल्या निर्णयावर अजूनही ठाम आहे. ज्या खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांत कठोर परिश्रम केले आहेत त्यांना आगामी T20 विश्वचषकात खेळण्याचा अधिकार आहे आणि त्यांना तो पूर्ण हक्क आहे आणि त्यांच्याकडे संघाला विश्वचषक जिंकून देण्यात मदत करण्याची क्षमता आहे हे दाखवण्याची संधी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Narine (@sunilnarine24)