T20 World Cup 2022: रोहित, कोहली आणि सूर्यकुमारच्या झंझावाताने उडवला नेदरलँड्सचा धुव्वा, नेदरलँडला दिले 180 धावांचे लक्ष्य

T20 विश्वचषक 2022 मधील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँड्ससमोर विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून रोहित शर्माशिवाय विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी नाबाद अर्धशतके झळकावली. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. उपकर्णधार केएल राहुल तिसऱ्या षटकात केवळ 9 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. सलग दुसऱ्या सामन्यात राहुलची बॅट नि:शब्द झाली आहे. नेदरलँडच्या गोलंदाजांनी पहिल्या 6 षटकांत आपली पकड घट्ट केली. पॉवरप्लेमध्ये भारताला 1 गडी गमावून केवळ 32 धावा करता आल्या. भारताने 9व्या षटकात 50 धावा पूर्ण केल्या. 10 षटकापर्यंत टीम इंडियाची धावसंख्या 1 गडी गमावून 67 धावा होती.
रोहित शर्मानेही वेग पकडत 35 चेंडूत 29 वे अर्धशतक झळकावले, मात्र तो 53 धावा करून क्लासेनचा बळी ठरला. यानंतर कोहलीला साथ देण्यासाठी आलेल्या सूर्यकुमार यादवने 95 धावांची भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. विराट कोहलीने 37 चेंडूत अर्धशतक ठोकले. या खेळीच्या जोरावर तो T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ख्रिस गेलला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. डावाच्या शेवटच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने षटकार ठोकला आणि 25 चेंडूत 51 धावा केल्या. कोहली 62 धावांवर नाबाद राहिला.
T20 World Cup 2022: हिटमॅन रोहित शर्माने मोडला एमएस धोनीचा हा’ विक्रम!
Suryakumar Yadav finishes the India innings in style ⚡
Will Netherlands chase the target?#NEDvIND |📝: https://t.co/2eJmEzrmPu pic.twitter.com/8ElXhO8KdW
— ICC (@ICC) October 27, 2022