
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाच्या मोहिमेची सुरुवात 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने होणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा भारत-पाकिस्तान यांच्यातील या शानदार सामन्याकडे लागल्या आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाचा विश्वास आहे की, जर टीम इंडिया पाकिस्तानला हरवण्यात यशस्वी ठरली तर ती टी-20 वर्ल्ड कप जिंकू शकते.
गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ होती. यावेळी चाहत्यांना टीम इंडियाकडून मागील पराभवाचा बदला घेण्याची आशा आहे. हे पाहता सुरेश रैना म्हणाला, “जर आम्ही सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला हरवले तर विश्वचषक जिंकण्याची खात्री आहे.” हेही वाचा – विश्वचषकानंतर ‘हे’ 3 भारतीय दिग्गज T20 फॉरमॅट खेळणार नाहीत! पहा यादीत कोणा-कोणाचा आहे समावेश?
टीम इंडिया चांगली कामगिरी करत असल्याचं सुरेश रैनाचं मत आहे. तो म्हणाला, ‘भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दुखापतग्रस्त बुमराहची जागा शमीने घेतली आहे. आमची गोलंदाजी चांगली आहे. अर्शदीप आहे. सूर्यकुमार उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. विराट कोहलीनेही आपला जुना फॉर्म परत मिळवला आहे. हेही वाचा – ऑस्ट्रेलियाला मिळाला ‘नवा’ कर्णधार, डेव्हिड वॉर्नर नाही तर ‘या’ खेळाडूकडे संघाची कमान