T20 WC 2022: पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तान भिडणार न्यूझीलंडशी, सामना कधी आणि कुठं पाहणार, घ्या जाणून

WhatsApp Group

Pakistan vs New Zealand Semifinal: T20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. न्यूझीलंडने ग्रुप-1 मध्ये अव्वल स्थानावर राहून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर पाकिस्तानच्या संघाने गट-2 मध्ये दुसऱ्या स्थानावर राहून अंतिम चारमधील तिकीट कापले आहे. यामध्ये पाकिस्तानला नशिबाचीही मोठी साथ लाभली आहे.

सामना कधी आणि कुठे होणार?

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 9 नोव्हेंबर (बुधवार) दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. हा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. पावसामुळे नियोजित दिवशी सामना होऊ शकला नाही तर दुसऱ्या दिवशी खेळवला जाणार आहे. म्हणजेच उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

 थेट प्रक्षेपण तुम्ही कुठे पाहू शकता?

भारतातील T20 विश्वचषक 2022 च्या सर्व सामन्यांचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. अशा परिस्थितीत या उपांत्य फेरीच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. यासोबत डिस्ने + हॉटस्टार अॅपवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

पाकिस्तान-न्यूझीलंड हेड टू हेड रेकॉर्ड?

पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत 28 T20 सामने झाले आहेत. यामध्ये पाकिस्तानने 17 आणि न्यूझीलंडने 11 सामने जिंकले आहेत. म्हणजेच किवीजवर पाक संघाचा वरचष्मा आहे. अलीकडेच पाकिस्तानने न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीवर हरवले होते. T20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानने तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला.