अपहरण झालेल्या डुग्गुचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश!

WhatsApp Group

पुण्यातल्या डॉ. सतीश चव्हाण यांचा मुलगा स्वर्णव (डुग्गु) Swarnav Chavan , वय वर्ष ४, याचे काही दिवसांपूर्वी बालेवाडी पोलीस स्टेशनसमोरून अपहरण करण्यात आलं होतं. तो मुलगा पोलिसांना सापडला आहे.

स्वर्णवला (डुग्गु) अपहरणकर्त्यांनी पुनावळ्याच्या पुलाशेजारी आणून सोडलं होतं. त्यानंतर डुग्गुचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आले.


जवळपास ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकरी स्वर्णवचा सर्वत्र शोध घेत होते. अखेर आज दुपारच्या सुमारास वाकड जवळील पुनावळे येथे स्वर्णव सापडला