Swara Bhaskar: महाराष्ट्र सरकारवर भडकली स्वरा भास्कर, ट्वीट करत म्हणाली…दर 5 वर्षांनी बंपर सेल लावा

WhatsApp Group

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडायला ती मागेपुढे पाहत नाही. त्यामुळे तिला काही वेळा टीकेलाही सामोरे जावे लागते. सध्या राज्यात राजकीय उलथापालथ सुरू आहे. ज्यावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया समोर आली आहे. ती पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर भडकळी आहे. स्वराने एक ट्विट केले असून त्यात तिने महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळावर संताप व्यक्त केला आहे.

राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करणारं ट्विट स्वरा भास्कर हिनं केलं आहे. आपण मतदान करतोच कशाला? निवडणुकांऐवजी दर पाच वर्षांनी बंपर सेल लावा, असं तिनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

स्वरा भास्करच्या या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी तिला ट्रोल देखील केलं आहे. ‘एक गोष्ट लक्षात ठेव, सर्वात आधी तू दिल्लीची मतदार आहेस, महाराष्ट्राची मतदार बनू नकोस,’ असं एका यूजरनं म्हटलं आहे. ‘तुम्ही कुठे मत देता?’ असा प्रश्न एका यूजरने तिला केला आहे.