जबरदस्त! मराठमोळ्या स्वप्नील कुसळेचा कांस्य पदकावर परफेक्ट निशाणा

WhatsApp Group

Swapnil Kusale Olympic Medal : स्वप्नील कुसळेने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचला आहे. त्याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदक जिंकले आहे. 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये त्याने हे पदक जिंकले आहे.

भारताचे हे तिसरे पदक आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा तो सातवा भारतीय नेमबाज ठरला आहे.

कोण आहे स्वप्नील कुसळे?
स्वप्नील कुसाळे हा पुण्याचा रहिवासी असून तो शेतकरी कुटुंबातील आहे. स्वप्नीलने 2009 मध्ये शूटिंगला सुरुवात केली. त्याच्या वडिलांनी त्याला महाराष्ट्राच्या प्राथमिक क्रीडा प्रबोधिनीमध्ये दाखल केले आणि वर्षभरानंतर स्वप्नीलने नेमबाजीला आपले करिअर म्हणून निवडले. शूटिंगमध्ये झोकून दिल्यानंतर स्वप्नीलने मागे वळून पाहिले नाही.