Suzuki Access: नवीन अ‍ॅक्सेस स्कूटरची धमाकेदार एंट्री! फीचर्स, मायलेज आणि किंमतीची संपूर्ण माहिती वाचा

WhatsApp Group

मुंबई | १८ मे २०२५ — भारतातील स्कूटर सेगमेंटमध्ये टॉपला असलेल्या होंडा अ‍ॅक्टिव्हा १२५ आणि टीव्हीएस ज्युपिटर १२५ ला टक्कर देण्यासाठी सुझुकी मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया कंपनीने आपली सर्वाधिक लोकप्रिय स्कूटर अ‍ॅक्सेस १२५ नवीन स्वरूपात लाँच केली आहे. या नवीन सुझुकी अ‍ॅक्सेस राइड कनेक्ट टीएफटी एडिशनमध्ये Suzuki Access Ride Connect TFT Edition lanch अत्याधुनिक फीचर्स आणि नवीन रंगसंगतीचा समावेश करण्यात आला आहे.

डिजिटल TFT डिस्प्ले आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटी

नवीन अ‍ॅक्सेसमध्ये कंपनीने प्रथमच ४.२-इंचाचा कलर TFT (Thin-Film Transistor) डिजिटल डिस्प्ले दिला आहे. यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह ‘राइड कनेक्ट’ तंत्रज्ञान देण्यात आले आहे, ज्यामुळे रायडरला वेग, इंधन पातळी, कॉल-अलर्ट्स, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन यांसारखी माहिती रिअल टाइममध्ये स्क्रीनवर मिळते.

हा TFT स्क्रीन दिवस-रात्र कोणत्याही प्रकाशात स्पष्ट दिसतो आणि आधुनिक स्कूटर चालवण्याचा अनुभव अधिक प्रगत बनवतो.

इंजिन

नवीन अ‍ॅक्सेसमध्ये १२४cc एअर-कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे, जे ८.४२ PS पॉवर आणि १०.२ Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन आता OBD2-B (On-board Diagnostics) मानकानुसार सुसज्ज करण्यात आले असून, इंधन कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरकता या दोन्ही बाबतीत सक्षम आहे.

नवीन रंगसंगती आणि डिझाईन

सुझुकीने ही स्कूटर पर्ल मॅट अ‍ॅक्वा सिल्व्हर रंगात नवीन फिनिशसह सादर केली आहे. याशिवाय, ती मॅट ब्लॅक, स्टेलर ब्लू, ग्रेस व्हाइट आणि आइस ग्रीन या पारंपरिक रंगांमध्येही उपलब्ध असेल. ही स्कूटर प्रीमियम लुक देण्यासाठी आकर्षक फिनिशिंग आणि आधुनिक डिझाईनसह सादर करण्यात आली आहे.

किंमत

नवीन सुझुकी अ‍ॅक्सेस राइड कनेक्ट टीएफटी एडिशनची एक्स-शोरूम किंमत ₹१,०१,९०० ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर भारतातील सर्व अधिकृत सुझुकी डीलरशिप्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

शहरातील रस्त्यांसाठी परफेक्ट पर्याय

ही स्कूटर उच्च गती, आरामदायी रायडिंग अनुभव, उत्तम मायलेज आणि टिकाऊपणासाठी ओळखली जाते. TFT डिस्प्ले आणि कनेक्टेड फीचर्समुळे ही स्कूटर तरुण ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकते.