
मुंबई | १८ मे २०२५ — देशातील कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी ब्रेझाने Maruti Brezza आपली लोकप्रियता कायम राखली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने १६,९७१ युनिट्स ब्रेझाची विक्री केली, जी मागील वर्षीच्या १७,०६३ युनिट्सच्या तुलनेत जवळपास १% वाढ दर्शवते. ब्रेझा अद्यापही या सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही आहे.
दुसऱ्या क्रमांकावर टाटा नेक्सॉनने आपले स्थान मजबूत केले असून, त्याने गेल्या महिन्यात १५,४५७ युनिट्स विकल्या. त्यानंतर फ्रँक्सने १४,३४५ युनिट्स विकून तिसरे स्थान मिळवले आहे. टाटा पंचने चौथ्या स्थानावर जागा निर्माण केली आहे, ज्याने १२,४९६ युनिट्स विकल्या. पाचव्या क्रमांकावर किआ सोनेट आहे, ज्याची विक्री ८,०६८ युनिट्स इतकी झाली आहे.
मारुती सुझुकी ब्रेझाची प्रमुख वैशिष्ट्ये
ब्रेझामध्ये के-सिरीज १.५-ड्युअल जेट डब्ल्यूटी पेट्रोल इंजिन दिले आहे, जे स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हे इंजिन १०३ एचपी पॉवर आणि १३७ एनएम टॉर्क निर्माण करते. गिअरबॉक्समध्ये ६-स्पीड ट्रान्समिशन आहे, जे ड्रायव्हिंगला अधिक गतिमान बनवते.
मायलेजच्या बाबतीत, मॅन्युअल व्हेरियंट २०.१५ किमी प्रति लिटर तर ऑटोमॅटिक व्हेरियंट १९.८० किमी प्रति लिटर मायलेज देतो. तर सीएनजी मोडमध्ये २५ किमी प्रति किलोमीटर पर्यंत मायलेज मिळू शकतो.
डिझाइन आणि सुरक्षा
ब्रेझा ही एसयूव्ही प्रचंड स्पेससह येते, ज्यात ५ लोक आरामात बसू शकतात. वाहनात ३६० अंश कॅमेरा असून, तो बहुमुखी माहिती आणि सुरक्षिततेसाठी मदत करतो. सुरक्षेसाठी यात ६ एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), आणि ३ पॉइंट सीट बेल्ट्स आहेत, जे प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करतात.
ब्रेझा शहरात तसेच हायवेवर आरामदायक आणि सशक्त ड्रायव्हिंग अनुभव देते. तिच्या पॉवरफुल इंजिनमुळे गाडी कधीच धीम्या पडत नाही आणि रस्त्यांवर चांगली स्थिरता देते.
किंमत
जर तुमचे बजेट सुमारे १० लाख रुपये असेल, तर ब्रेझा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. उत्कृष्ट फीचर्स, सुरक्षितता आणि विश्वासार्हतेच्या बाबतीत ब्रेझा बाजारात आपले वेगळे स्थान निर्माण करत आहे.