माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिने आज सोशल मीडियावर एक बातमी शेअर केली आहे ज्यानंतर चाहते तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. सुष्मिता सेनने इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये सांगितले की, तिला यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला आहे Sushmita Sen Heart Attack. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेल्या सुष्मिता सेनने तिच्या तब्येतीविषयी माहिती देताना सांगितले की, तिला यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर तिची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. आता तिची प्रकृती ठीक असल्याचे सुष्मिता सेनने चाहत्यांना सांगितले.सुष्मिता सेन एक फोटो शेअर करत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली
View this post on Instagram
सुष्मिता सेन तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. चित्रपटांनंतर सुष्मिता सेनने आता ओटीटीवर तसेच ‘आर्या’ या वेबसिरीजद्वारे डेब्यू केला आहे. या मालिकेतील दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आगामी काळात सुष्मिता सेनकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत, ज्यात ‘आर्या’ या वेब सीरिजच्या तिसऱ्या भागाचा समावेश आहे. याशिवाय सुष्मिता सेन ‘ताली’ या ट्रान्सजेंडर श्री गौरी सावंतवर आधारित बायोपिकमध्येही दिसणार आहे. शूटिंग पूर्ण झाल्यावर सुष्मिता सेनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.