Video: एसी, सोफ्यासाठी पैसे मागितल्यानं ठाकरे गटाच्या नेत्याकडून सुषमा अंधारेंना मारहाण

0
WhatsApp Group

शिवसेनेमध्ये बंडखोरी नंतर उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. बंडखोरी होऊन जवळपास अकरा महिने पूर्ण झाले आहेत. मात्र उद्धव ठाकरे गटाची गळती थांबताना दिसत नाहीये. दररोज कोणता ना कोणता नेता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे.

दरम्यान बीडमधून ठाकरे गटातील वाद समोर आला आहे. ठाकरे गटाचे बीडमधील स्थानिक नेते गणेश वरेकर आणि जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांच्यातील वाद आता समोर आला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासमोरच या दोन नेत्यांमध्ये वाद झाला आहे. दरम्यान यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांनी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या आहेत. अप्पा जाधव यांनी स्वत: व्हिडीओ शेअर करत हा दावा केला आहे.