Sushant Singh Rajput : सुशांतसिंह राजपूतची हत्याच झाली, पोस्टमॉर्टम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा दावा

WhatsApp Group

Sushant Singh Rajput: बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी निधन झाल्यापासून आजपर्यंत चित्रपटसृष्टी आणि त्याचे चाहते या धक्क्यातून सावरू शकलेले नाहीत. 14 जून 2020 रोजी मुंबईतील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू दोन वर्षांनंतरही गूढच आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या तपासात सुशांतचा मृत्यू आत्महत्या असल्याचे म्हटले असले तरी या प्रकरणाचा तपास करणारी सीबीआय अद्याप कोणत्याही स्पष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. दरम्यान, अभिनेत्याच्या मृत्यूप्रकरणी आता नवा दावा समोर आला आहे.

सुशांत सिंगच्या मृत्यूबाबत नवा दावा

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबाबत अनेक धक्कादायक दावे समोर येत आहेत, आता अभिनेत्याच्या पोस्टमॉर्टम टीमचा भाग असलेले कूपर हॉस्पिटलचे कर्मचारी रूपकुमार शाह यांनी सुशांतच्या मृत्यूबाबत मोठा दावा केला आहे. रूपकुमार शाह यांच्या म्हणण्यानुसार, सुशांतला रुग्णालयात आणेपर्यंत त्याच्या मानेवर अनेक खुणा होत्या, त्याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली होती. रूपकुमारच्या या दाव्यामुळे सुशांत सिंगच्या मृत्यूबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोशल मीडियावरील चाहते अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण लवकरच उघड करण्यासाठी दबाव आणत आहेत.

सुशांतच्या शरीरावर अनेक खुणा होत्या

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रूपकुमार शाह म्हणाले, ‘सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला तेव्हा आम्हाला कूपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाच मृतदेह मिळाले होते. त्या पाच मृतदेहांपैकी एक मृतदेह सुशांतचा होता. आम्ही पोस्टमार्टम करायला गेलो तेव्हा त्याची ओळख सुशांत अशी झाली. त्याच्या शरीरावर अनेक खुणा व्यतिरिक्त त्याच्या मानेवर दोन ते तीन खुणा होत्या. इतकंच नाही तर रुपकुमार शाहने इतरही अनेक मोठे दावे केले आहेत.

ते पुढे म्हणाले की पोस्टमॉर्टमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे आवश्यक होते, परंतु उच्च अधिकार्‍यांनी केवळ मृतदेहाचे फोटो घेण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या आदेशानुसार आम्ही केले. पुढे बोलताना शाह म्हणाले, ‘जेव्हा मी सुरुवातीला सुशांतचा मृतदेह पाहिला तेव्हा मी लगेच माझ्या अधिकाऱ्यांना सांगितले की, मला वाटते की ही आत्महत्या नसून हत्या आहे. काम करताना नियम पाळण्याचा सल्लाही मी त्यांना दिला. मात्र अधिकाऱ्यांनी मला लवकरात लवकर फोटो क्लिक करून मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यास सांगितले. त्यामुळे आम्ही रात्रीच पोस्टमॉर्टम केले.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा