IND vs SA: सूर्यकुमारच्या नाबाद अर्धशतकाने मोडले ‘हे’ दोन मोठे विक्रम, रिजवानचा विक्रम मातीत

WhatsApp Group

India vs South Africa: भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव ज्या शानदार फॉर्ममध्ये दिसत आहे त्यामुळे विरोधी संघांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिकेत धावांचा पाऊस पाडल्यानंतर सुर्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला शानदार सुरुवात केली. सूर्याने त्रिवेंद्रममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 33 चेंडूत नाबाद 50 धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली. या खेळीने सूर्यकुमारने 1-2 नव्हे तर तीन मोठे विक्रम मोडीत काढले.

सूर्यकुमार T20 क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. शिखर धवनला मागे टाकत त्याने हे स्थान मिळवले. सूर्याने 2022 मध्ये आतापर्यंत 708 धावा केल्या आहेत. त्याचवेळी धवनने 2018 मध्ये 689 धावा केल्या होत्या. आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात सुर्याने नाबाद 50 धावा करताना 3 मोठे षटकारही मारले, ज्याच्या जोरावर तो आता T20 क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचा विक्रम मोडला. रिजवानने 2021 साली T20 मध्ये 42 षटकार मारले होते.

एका वर्षात भारतासाठी सर्वाधिक T20 धावा 

  • 708 – सूर्यकुमार यादव, 2022
  • 689 – शिखर धवन, 2018
  • 641 – विराट कोहली, 2016

एका वर्षात T20 मध्ये सर्वाधिक षटकार

  • 45 – सूर्यकुमार यादव, 2022
  • 42 – मोहम्मद रिझवान, 2021
  • 41 – मार्टिन गुप्टिल, 2021