मॅचविनिंग इनिंगनंतर सूर्यकुमार यादवने जिंकली सर्वांची मनं, व्हिडिओ झाला व्हायरल

WhatsApp Group

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. भारताने 2 ऑगस्ट रोजी खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना सात गडी राखून जिंकला. या विजयासह टीम इंडियाने दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील पराभवाचा बदलाही घेतला. कर्णधार रोहित शर्मासोबत सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा डावाची सलामी दिली, पण यावेळी निराश झाला नाही. सूर्याने या सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाचं घाम काढला. 44 चेंडूत 76 धावांची धडाकेबाज खेळी करून तो बाद झाला. सूर्या त्याच्या फलंदाजीमुळे चर्चेत असतानाच आणखी एका कारणासाठीही त्याचे खूप कौतुक केले जात आहे.

सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांना ऑटोग्राफ दिला. त्याचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ट्वीट करत शेअर केला आहे.

अवघ्या 11 धावा केल्यानंतर रोहितला दुखापतग्रस्त अवस्थेत रिटायर व्हावे लागले, पण त्यानंतर सूर्या आणि श्रेयस अय्यरने मिळून टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. रोहितने सामन्यानंतर सांगितले की, मला बरे वाटत आहे, मात्र चौथ्या T20 सामन्यापूर्वी तो तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. या मालिकेतील चौथा आणि पाचवा T20 सामना 6 आणि 7 ऑगस्ट रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणार आहे.