टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात खराब सुरुवात झाली होती. इशान किशन, रोहित शर्मा आणि नंतर श्रेयस अय्यर पहिल्या दोन षटकांत बाद झाले. यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल मिळून संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसलेला सूर्यकुमार यादव मात्र बिंधास्त पोटपुजा करताना कॅमेरात कैद झाला.
त्यानंतर कॅमेरामनने त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. यावेळी सूर्याने चमच्याने खात होता. मात्र जेव्हा कॅमेरा आपल्यावर फोकस झाला आहे असं कळताच सूर्याने तोंड हलवणं बंद केलं. चोरी पकडली गेल्यासारखी त्याची प्रतिक्रिया होती.
त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सूर्यकुमार यादव यानेही प्रतिक्रिया दिली आहे. सूर्याने इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर कमेंटमध्ये लिहिले – अरे भाऊ. यासोबतच त्याने तीन हसणारे इमोजीही जोडले आहेत.
View this post on Instagram
सूर्यकुमार यादव हा टी-20 मध्ये जगातील नंबर वन फलंदाज आहे. या फॉरमॅटमध्ये प्रत्येक गोलंदाज त्याला घाबरतो. पण एकदिवसीय सामन्यात कथा बदलते. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये तीन शतके झळकावणाऱ्या सूर्याची बॅटमध्ये सरासरी 30 पेक्षा कमी आहे. आशिया चषकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने निश्चितपणे दोन अर्धशतके झळकावली. पण आजपर्यंत तो टी-20 प्रमाणे एकदिवसीय क्रिकेटमध्ये छाप सोडू शकलेला नाही. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये, तो 46 च्या सरासरीने आणि 173 च्या स्ट्राइक रेटने धावा करतो.