
Suraya Kumar Yadav in ICC T20 Rankings: ICC ने टी-20 च्या फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या या ताज्या क्रमवारीत भारताचा स्टार टी-20 फलंदाज सूर्यकुमार यादवला मोठा फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने 69 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. त्याला या खेळीचा फायदा झाला आणि आता तो पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकत आयसीसी टी-20 फलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर या क्रमवारीत पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान 861 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे.
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकत ICC टी-20 फलंदाजी क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे. सूर्यकुमार यादवशिवाय भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आपल्या गोलंदाजी क्रमवारीत एक स्थान गमावले असून तो आता 10व्या स्थानावर पोहोचला आहे. भुवनेश्वर कुमार व्यतिरिक्त, अक्षर पटेलने आपल्या गोलंदाजी क्रमवारीत बरीच प्रगती केली आहे त्याने 18 व्या स्थानावरून 11 व्या स्थानावर सात स्थानांनी झेप घेतली आहे. अक्षरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार गोलंदाजी करत तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 8 बळी घेतले.
India and Pakistan stars among the big movers in the latest @MRFWorldwide ICC Men’s T20I Player Rankings 🇮🇳 🇵🇰
Full story 👇
— ICC (@ICC) September 28, 2022
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. 2022 टी-20 विश्वचषक पाहता ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे.