ICC T20 Rankings: ‘सूर्या’ची पाकिस्तानला धास्ती! आयसीसी टी-20 क्रमवारीत सूर्याने बाबर आझमला टाकले मागे

WhatsApp Group

ICC T20I Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-20 फॉर्मेटमधील नवीनतम क्रमवारी जाहीर केली आहे. भारताच्या सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांनी ताज्या क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. तर पाकिस्तानकचा कर्णधार बाबर आझमची घसरण सुरूच असून तो आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान टी-20 क्रमवारीत अव्वल क्रमांकावर कायम आहे.

मोहम्मद रिझवान 825 गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. दक्षिण आफ्रिकेचा मार्कराम 792 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सूर्यकुमार यादवने ताज्या क्रमवारीत स्थान मिळवले असून तो आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सूर्यकुमारचे 780 गुण असून येत्या दोन सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली तर त्याला दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची संधी आहे.

सततच्या खराब कामगिरीचा फटका बाबर आझमला सहन करावा लागत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला बाबर आझमने टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा मुकुट गमावला होता. यानंतर बाबर आझम आता चौथ्या स्थानावर पोहोचला असून त्याचे 771 गुण झाले आहेत. इंग्लंडचा डेव्हिड मलान 725 गुणांसह पाचव्या क्रमांकावर कायम आहे.

सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या शानदार फॉर्ममध्ये

तीन महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर हार्दिक पांड्याने जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. हार्दिक पांड्याला आता त्याच्या सर्वोत्तम कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. हार्दिक पांड्या टी-20 आंतरराष्ट्रीय अष्टपैलूंच्या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे, सूर्यकुमार यादवबद्दल बोलायचे झाले तर, तो या वर्षातील टी-20 आंतरराष्ट्रीय मधील भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. सूर्यकुमार यादवने या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 18 डाव खेळले असून त्याने 613 धावा केल्या आहेत. यादरम्यान सूर्यकुमार यादवची सरासरी 38.31 आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट 182.44 आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा