Suryakumar Yadav: टी-20 मध्ये सूर्याचं चौथं शतक, अनेक विक्रम नावावर

WhatsApp Group

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा टी-20 सामना खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून यशस्वी जैस्वाल आणि सूर्यकुमार यादव यांनी शानदार फलंदाजी केली. या सामन्यात सूर्यकुमार यादवने उत्कृष्ट शतक झळकावत अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उत्कृष्ट खेळी केली. त्याने आपल्या स्फोटक खेळीने सर्वांची मने जिंकली आहेत. त्याने स्फोटक शतक झळकावत 100 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-20मधील त्याचे हे चौथे शतक आहे. यासह, तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये संयुक्तपणे सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे. त्याने रोहित शर्मा आणि ग्लेन मॅक्सवेलची बरोबरी केली आहे. त्याचबरोबर त्याने बाबर आझमलाही मागे टाकले आहे. बाबरने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये तीन शतके झळकावली आहेत.

टी-20 मध्ये सर्वाधिक शतके करणारे खेळाडू

  • सूर्यकुमार यादव- 4 शतके
  • रोहित शर्मा – 4 शतके
  • ग्लेन मॅक्सवेल- 4 शतके
  • बाबर आझम – 3 शतके
  • कॉलिन मुनरो – 3 शतके