कोलकाताविरुद्धच्या सामन्याआधी मुंबईला मोठा धक्का ‘हा’ खेळाडू आयपीएलमधून बाहेर

WhatsApp Group

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई इंडियन्सचा सुपर फॉर्मात असलेला फलंदाज सूर्यकुमार यादव हा या हंगामातून बाहेर पडला आहे. सूर्यकुमारच्या डाव्या हाताचे पुढील स्नायू ताणल्यामुळे तो या हंगामातून बाहेर पडला आहे. मुंबईच्या संघासाठी हा मोठा धक्का आहे. मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.

आयपीएलच्या या हंगामात सूर्यकुमारला केवळ आठ सामने खेळता आले आहेत. संघाच्या पहिल्या दोन सामन्यात तो खेळू शकला नव्हता. या मोसमात त्याने तीन अर्धशतके झळकावली, पण मुंबई संघाच्या कामगिरीत त्याला सुधारणा करता आली नाही. 10 पैकी 8 सामने गमावून मुंबईचा संघ आधीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.