सूर्याने उडवला आफ्रिकेचा धुव्वा, १८ चेंडूत साजरं केलं अर्धशतक, हजार धवाही केल्या पूर्ण

WhatsApp Group

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. तबरेज शम्सीच्या जागी लुंगी एनगिडीचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाने तीन T20I सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला. मालिकेतील दुसरा सामना रविवारी (१ ऑक्टोबर) बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे.


भारताने प्रथम फलंदाजी करताना शानदार सुरूवात केली. भारतासाठी केएल राहुलने आणि सूर्याने अर्धशतक साजरं केलं. सुर्यकुमार यादवने Suryakumar Yadav अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक साजरं केलं. या अर्धशतकासह त्याने T20I क्रिकेटमध्ये 1 हजार धवाही पूर्ण केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय T20I मध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. या सामन्यात फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमारने 24 धावा पूर्ण करताच हे स्थान गाठले. सूर्यकुमार यादव आता आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 1000 धावा करणारा खेळाडू बनला आहे.