ICC Rankings: सूर्याने रिझवानची ‘राजवट’ संपवली; T20 क्रमवारीत बनला नंबर वन फलंदाज

WhatsApp Group

ICC Rankings: भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने टी-20 क्रमवारीत अव्वल क्रमांकाची खुर्ची काबीज करून पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानची राजवट संपवली आहे. 32 वर्षीय उजव्या हाताच्या फलंदाजाला टी-20 विश्वचषकातील उत्कृष्ट कामगिरीचे फळ मिळाले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत सूर्या पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे तर पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद रिझवान एका स्थानाच्या घसरणीसह दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

टॉप 10 फलंदाजांमध्ये दोन भारतीय

भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर सूर्याशिवाय विराट कोहलीचा टॉप 10 मध्ये समावेश आहे. त्याच वेळी, रोहित एका स्थानाच्या नुकसानासह 15 व्या, केएल राहुल 22 व्या, इशान किशन 34 व्या क्रमांकावर आहे.

अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. तर श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा याने तीन स्थानांनी झेप घेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे, तबरेझ शम्सी आणि जोश हेझलवूड अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. सॅम कुरननेही अव्वल 10 मध्ये कमालीची प्रगती केली असून पाच स्थानांनी झेप घेत सहाव्या क्रमांकावर आहे. भारताचा भुवनेश्वर कुमार 11व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर अश्विननेही एका स्थानाने प्रगती करत 18व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

अष्टपैलूंच्या क्रमवारीत शाकिब अल हसन अव्वल स्थानावर आहे. त्याच्यानंतर मोहम्मद नबी दुसऱ्या तर हार्दिक पांड्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय मोईन अली चौथ्या आणि नामिबियाचा जेजे स्मित पाचव्या स्थानावर आहे.