कोलकाता: रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सुर्यकुमार यादव Suryakumar Yadav केवळ सामनावीर ठरला नाही तर मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूही ठरला. भारताने रविवारी ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 17 धावांनी पराभव करत सलग चौथी टी-२० मालिका जिंकली. यापूर्वी भारताने 2019 मध्ये वेस्ट इंडिजचा 2-1 आणि 3-0 आणि 2018 मध्ये 3-0 असा पराभव केला होता.
सुर्यकुमारने या T20 मालिकेतील तीन सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक 107 धावा केल्या, ज्यामध्ये त्याचा स्कोअर अनुक्रमे 34, 8 आणि नाबाद 65 असा आहे. तिसऱ्या सामन्यात भारताची धावसंख्या चार गडी गमावून 93 धावा असताना सुर्यकुमार फलंदाजीसाठी मैदानात आला. यानंतर त्याने व्यंकटेशच्या साथीने वेगवान धावा करत 6.1 षटकांत 91 धावा केल्या. सूर्याने 31 चेंडूंत एक चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 65 धावा केल्या.
सामन्यानंतर सुर्यकुमार म्हणाला, ‘रोहित शर्मा बाद झाल्यानंतर कुणाला एकाला तरी शेवटपर्यंत टिकून राहून चांगली धावसंख्या उभारावी लागणार होती. अशा कठीण परिस्थितीत आम्ही टीम मीटिंगमध्ये चांगले काम करण्याविषयी बोलतो आणि आज मी तेच केले. मी नेटमध्येही गोष्टी सोप्या ठेवण्याचे काम करत आहे. मी नेटमधील प्रत्येक चेंडूला न मारता व्यवस्थित सराव करत असतो.