सूर्यकुमार यादव आणि इशान किशनने केला अल्लू अर्जुनच्या ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स

WhatsApp Group

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने दक्षिण भारतीय सुपरहिट चित्रपट ‘पुषा: द राइज’मधील ‘श्रीवल्ली’ गाण्यावर इशान किशनसोबत डान्स केला आहे. त्याने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

व्हिडिओ क्लिपच्या सुरुवातीला सूर्यकुमार एकटाच डान्स स्टेप करतो आणि किशन त्याच्यासोबत सामील होण्याआधीच त्याची उजवी चप्पल त्याच्या पायातून निसटते. हे पाहून किशनला हसू आवरता आले नाही. सूर्यकुमारने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


अल्लू अर्जुन स्टारर चित्रपट, ‘पुष्पा: द राइज’ हा तेलगू भाषेतील अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटाचा भाग 1 गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा या चित्रपटातील अर्जुनचा लूक रिक्रिएट करताना दिसला होता.