MI vs GT : गुजरातविरुद्ध Suryakumar Yadav ने झळकावले धमाकेदार शतक!

0
WhatsApp Group

IPL चा 57 वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (MI vs GT) यांच्यात वानखेडेवर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 218 धावा केल्या. ज्यात विष्णू विनोद आणि सूर्यकुमार यादव यांनी आक्रमक फलंदाजी करताना गुजरातच्या गोलंदाजांना जेरीस आणले.

गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या जात असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ पूर्ण नियोजन करून मैदानात उतरला होता. डावाची सुरुवात करताना पहिल्याच चेंडूपासून इशान किशन आणि रोहित शर्माने फटकेबाजी सुरू केली. इशान किशनने 20 चेंडूत 31 तर रोहित शर्माने 18 चेंडूत 29 धावा केल्या. या दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. आक्रमक फलंदाजी करताना नेहल 12 धावा करून बाद झाला.


पण मधल्या फळीत, विष्णू विनोद आणि सूर्यकुमार यादव यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. विष्णू 30 धावा करून बाद झाला.पण सूर्यकुमारने Suryakumar Yadav वेगवान फलंदाजी करत 32 चेंडूत अर्धशतक ठोकले, त्याने 103 धावांची खेळी केली. या दोन्ही खेळाडूंच्या शानदार फलंदाजीनंतर दोन्ही फलंदाजांचं जोरदार कौतुक होत आहे.