रात्री विवस्त्र होऊन झोपण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे; ताण-तणाव दूर होईल आणि आरोग्यात होईल सुधार!
बदलत्या जीवनशैलीत शांत आणि दर्जेदार झोप मिळणे हे एक आव्हान झाले आहे. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री विवस्त्र (बिना कपड्यांचे) झोपणे हे आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. यामुळे केवळ झोपच चांगली लागत नाही, तर शरीरातील संप्रेरकांचे (Harmones) संतुलन राखण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यासही मोठी मदत होते.
गढूळ झोप आणि वजन नियंत्रण
जेव्हा तुम्ही विवस्त्र झोपता, तेव्हा शरीराला नैसर्गिकरीत्या तापमान अर्ध्या अंशाने कमी करण्यास मदत होते. गाढ झोपेसाठी शरीराचे तापमान कमी असणे आवश्यक असते. चांगली झोप मिळाल्यामुळे ‘लेप्टिन’ आणि ‘घ्रेलीन’ या भूकेवर नियंत्रण ठेवणाऱ्या हार्मोन्सचे संतुलन राहते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. अपुऱ्या झोपेमुळे भूक वाढते आणि वजन वाढण्याचा धोका असतो.
तणावमुक्ती आणि मानसिक आरोग्य
चिंता आणि मानसिक तणावाचा थेट संबंध झोपेशी असतो. विवस्त्र झोपल्यामुळे झोपेचा दर्जा सुधारतो आणि शरीरातील ‘कोर्टिसोल’ (तणाव वाढवणारे हार्मोन) पातळी नियंत्रित राहते. यामुळे मन शांत राहते आणि तणाव कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात हा उपाय शरीराला नैसर्गिक थंडावा देण्यासाठी उत्तम मानला जातो.
पुरुषांची प्रजनन क्षमता आणि रक्तभिसरण
काही संशोधनांनुसार, घट्ट कपडे घालून झोपल्याने अंडकोषाचे तापमान वाढते, ज्याचा परिणाम शुक्राणूंच्या गुणवत्तेवर होऊ शकतो. विवस्त्र झोपल्याने तापमान कमी राहते आणि पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते. याशिवाय, शरीरावर कपड्यांचे ओझे नसल्यामुळे रक्तभिसरण (Blood Flow) अधिक चांगल्या प्रकारे होते, ज्यामुळे हाय बीपी आणि कोलेस्ट्रॉल सारख्या समस्यांपासून बचाव होऊ शकतो. जोडीदारासोबत विवस्त्र झोपल्याने नात्यातील जवळीक वाढते आणि ऑक्सिटोसिन हार्मोन मुळे नाते अधिक घट्ट होते.
