आश्चर्य! महिलेने दिला तीन मुलांना जन्म

WhatsApp Group

प्रत्येक विवाहित महिलेचे स्वप्न असते की आपण आई व्हावे. आपल्याही घरात बाळ यावे. घरातील सर्वच जण बाळाची वाट पाहत असतात. मात्र, काही ठिकाणी अनेक कुटुंबीयांची इच्छा ही अपूर्ण राहताना दिसते. तर काही ठिकाणी अनेकांचे स्वप्न पूर्ण होते.

असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. एका कुटुंबातील महिलेने एकाच वेळी तीन मुलांना जन्म दिला. मुलांचा जन्म हा नॉरमल डिलिव्हरीच्या माध्यमातून झाला. ही घटना झारखंडच्या हजारीबागमध्ये घडली.

हजारीबागच्या मेडिकल कॉलेज रुग्णालच्या लेबर रूममध्ये चतरा जिल्ह्यातील मयूरहंड पोलीस ठाणे हद्दीतील अपरोग गावातील रहिवासी रामपोशन राणा याची पत्नी शोभा देवी या महिलेने तिळ्यांना जन्म दिला.

कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, आधी डॉक्टरांनी तपासणी दरम्यान सांगितले की, शक्यता रिम्स घेऊन जाण्याची आवश्यकता असेल. मात्र, लेबर रुमच्या नर्स यांनी सकारात्मक प्रयत्न केला आणि तिन्ही मुलांची नॉर्मल डिलिव्हरी केली. यामध्ये दोन मुलींचे वजन अजून कमी आहे. त्यांना शहरातील क्षितिज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एका मुलीची तब्येत चांगली असून तिला तिच्या आईसोबत हजारीबागमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहे.

लेबर रूममध्ये कार्यरत नर्स सुनीता टोप्पो यांनी सांगितले की, हजारीबागच्या सदर रुग्णालयात जवळपास चार ते वर्षांपूर्वी अशा तिळ्या बाळांचा जन्म झाला होता. ही घटना आता दुसऱ्यांदा घडली. दरम्यान, घरात तिळ्या मुलींचा जन्म झाल्याने त्यांचे वडील रामपोषण राणा आणि त्यांची पत्नी शोभा देवी आनंदित आहेत. देवाची कृपा आपल्यावर झाली, असे मानत आहेत.