क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का, भारताच्या ‘या’ धडाकेबाज खेळाडूने घेतली निवृत्ती

WhatsApp Group

भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज Suresh Raina retirement सुरेश रैनाने IPL 2023आधी आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रैनाने उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन (UPCA) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) याबाबत कळवलं असल्याची माहिती देखील समोर येत आहे. तो आता ख्रिस गेल, कायरन पोलार्ड इत्यादींप्रमाणे देश-विदेशातील क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

यापूर्वी सुरेश रैनाने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण तो उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत राहिला होता. तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्येही खेळत होता. तथापि, मागील आयपीएल 2022 हंगामात रैनाला कोणत्याही फ्रेंचायझीने विकत घेतले नव्हते. आयपीएल 2022 च्या 15 व्या हंगामात तो विकला गेला नसल्यामुळे त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या अटकळ सुरू झाल्या होत्या. पण, सततच्या दुर्लक्षामुळे रैनाने आता भारतीय क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती जाहीर केली आहे. रैनाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

35 वर्षीय सुरेश रैनाने ट्विटमध्ये लिहिले की, ‘देश आणि उत्तर प्रदेश राज्यासाठी क्रिकेट खेळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. तसेच मी बीसीसीआय, यूपी क्रिकेट असोसिएशन, आयपीएल टीम सीएसके आणि राजीव शुक्ला यांचे आभार मानतो. मला पाठिंबा दिल्याबद्दल माझ्या चाहत्यांचेही आभार.

सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

सुरेश रैनाने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रैनाने 18 कसोटी सामन्यात शतकाच्या जोरावर 768 धावा केल्या. या मधल्या फळीतील फलंदाजाने टीम इंडियासाठी 226 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तो संघाचा सदस्य राहिला आहे.  यादरम्यान रैनाने पाच शतकांसह 5,615 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, 78 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रैनाच्या नावावर 1,605 धावा आहेत. 2011 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा तो सदस्य राहिला होता.
– समीर आमुणेकर