सुरेश रैनाने श्रीवल्ली गाण्यावर केला डान्स, अल्लू अर्जुनने केली खास कमेंट

WhatsApp Group

भारताचा माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैनाने नुकताच त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो ‘पुष्पा-द राइज‘ या चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर अल्लू अर्जुनच्या allu arjun हुक स्टेप्स करताना दिसत आहे suresh raina dance . या व्हिडीओत सुरेश रैना अल्लू अर्जुनप्रमाणे डान्स करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suresh Raina (@sureshraina3)


सुरेश रैनाचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत असून गेल्या २४ तासांमध्ये या व्हिडिओला १० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. इंस्टाग्राम वापरकर्त्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला असून अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे ‘पुष्पा’ चा हिरो असलेल्या अल्लू अर्जुननेही सुरेश रैनाच्याच्या या व्हिडिओवर ‘ग्रेट’ अशी कमेंट केली आहे.

श्रीवल्ली या गाण्यावर यापूर्वीही अनेक क्रिकेटपटूंनी डान्स करतानाचा आपला व्हिडीओ शेअर केला आहे. यात ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नर भारताचे सुर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांचा समावेश आहे.