राज ठाकरेंचे राजकारणामध्ये काहीच आस्तिव राहिलं नसल्यामुळे ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करतायत – सुरेखा पुणेकर

WhatsApp Group

पुणे – राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादमधील सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अनेक आरोप केले तसेच टीकाही केली होती. याच पार्श्वभूमीवर आथा लावणीसम्राटणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्या सरचिटणीस सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांनी राज ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

राज ठाकरेंचे राजकारणामध्ये काहीच आस्तिव राहिलं नसल्यामुळे ते चिडून पवारसाहेबांवर (Sharad Pawar) खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. मात्र सर्व जाती समभाव एक करुन गाव खेडी एकत्र करुन राज्यामध्ये पहिलं महिला धोरण पवारसाहेबांनी राबविले आहे. आता पवारसाहेबांवर खालच्या पातळीवर टीका करणेही राज ठाकरेंना शोभत नसल्याची बोचरी टीका सुरेखा पुणेकरांनी केली. त्या नारायणगाव येथील लावणी महोत्सवामद्धे सहभागी झाल्या होत्या त्यावेळी बोलत होत्या.

कालच्या औरंगाबाद येथील सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार हे जाती-जातींमध्ये भेद निर्माण करत आहेत ते पुस्तक वातचना सुद्धा लेखक कोणत्या जातीचा आहे हे बघतात. तसंच आपण बोलल्यापासूनच ते राष्ट्रवादींच्या सभांमधून शिवाजी महाराजांचे नावं घ्यायला सुरुवात झाली. तसेच मी शरद पवार नास्तिक आहेत हे बोलल्यावर चांगलच झोंबल. मला माहिती होतं ते मी बोललो लगेच देवाचे फोटो काढले. मात्र, त्यांच्या कन्येने लोकसभेत सांगितळे आहे की माझे वडील नास्तिक आहेत. आता यापेक्षा जास्त काय पुरावा देऊ मी’ असंही राज म्हणाले होते.