
गेल्या काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महिला पत्रकारासोबत बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. दरम्यान आता सुप्रिया सुळे यांनी महिला पत्रकार साडी का नेसत नाही? असा प्रश्न विचारला आहे. ‘चॅनलमधल्या मुली साडी का नाही नेसत? शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलताना? मग मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत? असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘टिकली’वर टीका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का..? चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या ! असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
‘टिकली’वर टीका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का..?
चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या !बिंदी पर टिप्पणी करने बखैडा खडे करनेवाले “साड़ी” पर टिप्पणी करने वाले इस नेता को टिप्पणी किये बगैर बखैडा खडा किये बगैर ही छोड़ देंगे क्या..?
चलो आप लोगों की इस बार परिक्षा हो जाये pic.twitter.com/O55GM9xqWt
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 20, 2022