टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागा; सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा यांना फटकारलं

WhatsApp Group

प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फटकारले आहे. तुमच्या वक्तव्यामुळे देशातील वातावरण बिघडले आहे, असं सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना सुनावले. तुम्ही टीव्हीवर जाऊन माफी मागावी, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, तुम्ही बेजबाबदार विधान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, तुम्ही स्वत:ला वकील म्हणता, तरीही तुम्ही असं वक्तव्य केलं. तुमच्या वक्तव्यामुळे देशातील वातावरण बिघडले आहे. तुमच्या वक्तव्यामुळे देशाची बदनामी झाली आहे.

यासोबतच सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माची याचिका फेटाळून लावली. याप्रकरणी तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जा, असं न्यायालयाने सांगितले. नुपूर शर्मा यांनी त्यांच्याविरुद्ध विविध राज्यांत दाखल झालेले सर्व खटले दिल्लीला हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला होता.