नितेश राणेंना बसला सर्वात मोठा धक्का

WhatsApp Group

नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राचे भाजप आमदार नितेश राणे यांना या जामीन फेटाळला आहे. मात्र राणेंना सुप्रीम कोर्टाने अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिले आहे Supreme Court rejects Nitesh Rane’s bail.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या महिन्यात दाखल झालेल्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी नितेश राणेंना ट्रायल कोर्टासमोर शरण जाण्याचे आणि नियमित जामीन घेण्याचे निर्देश दिले आहे.

संतोष परब हल्लाप्रकरणात सत्र आणि उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथेही त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे.

नितेश राणे यांच्याविरुद्धचा खटला गेल्या वर्षी 18 डिसेंबर रोजी झालेल्या संतोष परब हल्ला प्रकरणाशी संबंधित आहे, तक्रारदार, 44 वर्षीय संतोष परब यांनी दावा केला आहे की त्यांच्या दुचाकीला नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने धडक दिली होती.

संतोष परब यांनी आरोप केला होती की कारमधील प्रवाशांनी आपल्यावर हल्ला केला आणि त्यांच्यापैकी एकाने दुसर्‍या व्यक्तीला “गोट्या सावंत आणि नितेश राणे यांना माहिती द्यावी” असे सांगताना ऐकले.