मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

0
WhatsApp Group

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या मनीष सिसोदिया यांना पुन्हा एकदा न्यायालयाकडून जोरदार झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भाटी यांच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सिसोदिया यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फत तपास सुरू असलेल्या प्रकरणांवर निर्णय दिला. याआधी सुप्रीम कोर्टाने कथित दिल्ली उत्पादन शुल्क धोरण आणि मनीष सिसोदिया यांच्या विरोधात दाखल याचिकांबाबत सीबीआय आणि ईडीला अनेक प्रश्न विचारले होते. कुणालाही आयुष्यभर तुरुंगात ठेवता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले होते.

मनीष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्ट म्हणाले, तीन महिन्यांनंतर नवीन अर्ज दाखल करता येईल.

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया हे कथित दारू घोटाळ्याप्रकरणी फेब्रुवारीपासून तुरुंगात आहेत. सुप्रीम कोर्टाने मनीष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता आणि आज जामीन अर्ज फेटाळला आहे. मनीष सिसोदिया यांनी आपल्याविरुद्धच्या दोन वेगवेगळ्या खटल्यांमध्ये कोर्टाकडे जामीन मागितला आहे.