ठाकरेंच्या हातून शिवसेना जाणार? ठाकरे गटाने दाखल केलेला स्थगितीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

WhatsApp Group

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने भारतीय निवडणूक आयोगाला Election Commission of India एकनाथ शिंदे गट Eknath Shinde group हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यापासून रोखण्यास नकार दिला. दिवसभराच्या सुनावणीनंतर उद्दव ठाकरेंच्या गटाने दाखल केलेला स्थगितीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या विरुद्धच्या लढतीत उद्धव ठाकरेंना मोठा झटका देताना, खरी शिवसेना कोणाची, याचा निर्णय घेण्यापासून निवडणूक आयोगाला रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. उद्धव ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली होती की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या “खरी” शिवसेना आणि त्यांच्या चिन्हावरील दाव्यावर निर्णय घेण्यापासून निवडणूक आयोगाला थांबवावे.

उद्धव ठाकरेंचे माजी सहकारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्तापालटानंतर जूनमध्ये महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले, यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसह नवीन सरकार स्थापन केले. शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री झाले.