सुप्रीम कोर्टाचा ठाकरे सरकारला मोठा धक्का, भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केले रद्द

WhatsApp Group

नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला मोठा धक्का दिला आहे Supreme Court cancels BJP MLA suspension. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी निलंबन केलेल्या भाजपच्या १२ आमदारांचे 12 Maharashtra BJP MLA निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे.

सुप्रीम कोर्टाने भाजपच्या १२ आमदारांचे महाराष्ट्र विधानसभेतील एक वर्षाचे निलंबन घटनाबाह्य आणि मनमानी ठरवत रद्द केले आहे. तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून भाजपच्या या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते.