ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी शनिवारी शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की ही एक सदीच्छा भेट होती Rajinikanth meets Uddhav Thackeray . उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर अभिनेता रजनीकांत यांच्यासोबतच्या कुटुंबाचा फोटो शेअर करून आनंद व्यक्त केला आणि म्हटले की, “श्री रजनीकांत जी यांना पुन्हा एकदा मातोश्रीवर पाहून खूप आनंद झाला”.
शिवसेना (यूबीटी) नेत्याने सांगितले की, रजनीकांत हे शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळ ठाकरे यांचे मोठे समर्थक आहेत. त्यांची आणि उद्धव ठाकरे यांची ही अराजकीय भेट होती. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी आणि मुलगे आदित्य आणि तेजस यांनी वांद्रे येथील त्यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी अभिनेत्याचे स्वागत केले.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले की, “रजनीकांत यांना पुन्हा एकदा मातोश्रीवर पाहून आनंद झाला.” ऑक्टोबर 2010 मध्ये रजनीकांत यांनी बाळ ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. शुक्रवारी भारत ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान अभिनेता रजनीकांत वानखेडे स्टेडियमवर दिसले होते. त्यांनी आता उद्धव कुटुंबीयांची भेट घेतली आहे. रजनीकांत हे बाळा ठाकरे यांचे मोठे समर्थक असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच ते उद्धव कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले होते. शिवसेना (उद्धव गट) नेत्याने सांगितले की ही एक बिगर राजकीय बैठक होती.
An absolute delight to have Shri Rajnikant ji at Matoshri once again. pic.twitter.com/94MV7m0Rb9
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 18, 2023