
तंत्रज्ञानाच्या नव्या युगात भारत प्रवेश करत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (1ऑक्टोबर) नवी दिल्लीतील प्रगती मैदानात 5G सेवेचा शुभारंभ करतील. 5G तंत्रज्ञानामार्फत चांगले कव्हरेज, जास्त डेटा, कमी विलंब आणि अत्यंत विश्वासार्ह संवाद सुविधा प्राप्त होणार आहेत. 5G तंत्रज्ञान ऊर्जा सक्षमता, स्पेक्ट्रम सक्षमता आणि नेटवर्क सक्षमताही वाढवेल.