हैदराबाद – IPL 2022 च्या मेगा लिलावाची तयारी सुरू आहे. सर्व दहा संघ सध्या मेगा लिलावात आपल्या संघात कोणत्या खेळाडूचा समावेश करायचा याची रणनीती आखत आहेत, जेणेकरून ते संघ मजबूत होतील.
आयपीएलच्या मेगा लिलावासाठी आता काही अवधीच उरला आहे, त्यामुळे रणनीतीही अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने Sunrisers Hyderabad आपली नवी जर्सी लॉंच केली आहे.
सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या ट्विटर हँडलवरून संघाची नवी जर्सी शेअर केली आणि यावेळी संघाची जर्सी कशी असेल तेही सांगितले. या वेळीही संघ केशरी रंगातच मैदानात उतरणार आहे. तर जर्सीच्या रचनेत थोडा बदल करण्यात आला आहे. संघाचा लोगो जर्सीच्या डाव्या बाजूला ठेवला आहे. सध्या शेअर करण्यात आलेली जर्सी पूर्णपणे साधी आहे, काही कंपन्यांच्या जाहिरातीही त्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत.
Presenting our new jersey.
The #OrangeArmour for the #OrangeArmy ????#ReadyToRise #IPL pic.twitter.com/maWbAWA0pc
— SunRisers Hyderabad (@SunRisers) February 9, 2022
सनरायझर्स हैदराबाद संघाने फक्त एकदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. यंदा संघाची कमान ही केन विल्यमसनच्या हाती असेल. हैदराबादने केन विल्यमसन व्यतिरिक्त, अब्दुल समद आणि उमरान मलिक यांना संघात कायम ठेवले आहे.