प्रवेशपत्रावर छापला सनी लिओनीचा फोटो, कर्नाटक शिक्षक भरती परीक्षेचे प्रवेशपत्र व्हायरल

WhatsApp Group

कर्नाटकमध्ये शिक्षक भरती परीक्षा होणार असून, त्यासाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. एका उमेदवाराचे प्रवेशपत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर सनी लिओनीचा हॉट फोटो छापण्यात आला होता. राज्याच्या शिक्षण विभागाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

कर्नाटक काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष बीआर नायडू यांनी प्रवेशपत्राचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हॉल तिकिटावर उमेदवाराच्या फोटोऐवजी सनी लिओनीचा फोटो छापल्याचा आरोप त्यांनी शिक्षण विभागावर केला आहे. नायडू यांनी ट्विट करून लिहिले की, “शिक्षक भरती हॉल तिकीटमध्ये उमेदवाराच्या फोटोऐवजी, शिक्षण विभागाने ब्लू फिल्म अभिनेत्री सनी लिओनीचा फोटो छापला आहे. विधानसभेत पॉर्न चित्रपट पाहणाऱ्या पक्षाकडून आम्ही आणखी काय अपेक्षा करू शकतो.”

नायडू यांच्या आरोपावर कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले, “उमेदवाराला फोटो अपलोड करावा लागतो. यानंतर सिस्टम तेच फोटो घेते जो ते अपलोड करतात. जेव्हा आम्ही उमेदवाराला विचारले की तिने तिच्या प्रवेशपत्रावर सनी लिओनीचा फोटो टाकला आहे, तेव्हा तिने सांगितले की तिच्या पतीच्या मित्राने तो फोटो अपलोड केला आहे.