सनी लिओनीच्या अडचणीत वाढ, यापूर्वीही घडला आहे असा प्रकार; काय आहे प्रकरण?

WhatsApp Group

सनी लिओनीला बांगलादेशमध्ये काम (Sunny Leone Work Permit Cancelled in Bangladesh) करण्याची परवानगी पुन्हा एकदा नाकारण्यात आली आहे. बांगलादेशकडून तिचे वर्क परमिट नाकारण्यात आले आहे, अशी घटना तिच्यासोबत 2015 मध्येही घडली होती. सनीच्या पहिल्याचं बंगाली भाषेतील चित्रपटाबाबत हा प्रकार घडला आहे.

सनीच्या ‘सोल्जर’ सिनेमाचे शूटिंग बांगलादेशमध्ये करण्याची योजना होती, मात्र आता वर्क परमिट नाकारल्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना शूटिंग रद्द करावे लागतं आहे. सनीचा हा पहिलाच इंडो-बांगलादेशी चित्रपट आहे.

बॉलिवूडमध्ये आपले पक्क स्थान मिळवल्यानंतर सनी पहिल्यांदाच इंडो-बांगलादेशी चित्रपट करत आहे. मात्र वर्क परमिट रखडल्यामुळे तिच्या या सिनेमाचे शूटिंग आणि रीलिज दोन्ही लांबणीवर पडले आहे. मीडिया अहवालानुसार मिनिस्ट्री आफ इन्फरमेशन अँड ब्रॉडकास्टिंग बांगलादेशने हे वर्क परमिट नाकारले आहे.

त्यामुळे सनीच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोणत्या कारणामुळे हे वर्क परमिट रद्द करण्यात आले, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाहीय. मात्र अशा चर्चा आहेत की, काही इस्लामिक समुहांनी तिनं बांगलादेशात काम करण्याबाबत आक्षेप घेतला आहे. अशीही माहिती समोर आली आहे की या संघटनांनी याविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.