
बॉलीवुडची लोकप्रिय अभिनेत्री सनी लिओनी आज आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. सनीनं हिंदी सिनेमामध्ये काम करून वेगळं स्थानही निर्माण केलंच आहे. पण सनीभोवती अनेक वादही होते. तिच्यावर टीकाही खूप करण्यात आल्या. तीही तिच्या एका वक्तव्यामुळे.
सनी लिओनीनं काही वर्षांपूर्वी एक ट्विट केलं होतं. त्यामुळे ती मोठ्या अडचणीत सापडली होती. बलात्कारावर तिनं ट्विट केलं होतं आणि अभिनेता कमाल खान यावर तुटून पडला होता. त्यानं लिहिलं होते, ‘ सनी लिओनी म्हणतेय बलात्कार अपराध नाही. तो एक सरप्राइझ सेक्स आहे.’
सनी लिओनीनं आपण हे ट्विट केलंच नसल्याचा दावा केला होता. आपलं अकाऊंट पाच मिनिटांसाठी हॅक झालं होतं, असं ती म्हणाली. त्यानंतर तिने मुंबई पोलिसांच्या क्राइम इन्वेस्टिगेशन सेलमध्ये कमाल खानविरोधात तक्रार केली होती. मग गप्प बसेल तो कमाल खान कसला? त्यानेही सनी लिओनी आणि तिच्या पतीविरोधात उलटी तक्रार दाखल केली होती.
केकेआरनं सांगितलं होतं की, ‘पोलिसांनी २४ तासात सनी लिओनी आणि तिच्या पतीला अटक करायला हवं. नाही तर मी कोर्टामध्ये जाईन. मी फक्त सनी लिओनीविरोधात नाही तर तिच्या पती डेनियल वेबरविरोधातहा तक्रार दाखल केली आहे.’ यावर सनी लिओनी म्हणाली होती, ‘हा अतिशय मूर्खपणा आहे. मी याला उत्तर देऊ इच्छित नाही. दिल्लीमध्ये घडलेल्या त्या दुर्घटनेनंतर मला यात ओढू नका.असं ती म्हणाली होती.