Sunny Leone Admit Card: पोलिसात भरती होण्यासाठी सनी लिओनीनं केला अर्ज?

WhatsApp Group

Sunny Leone Admit Card: यूपी पोलीस कॉन्स्टेबलच्या 60244 पदांच्या भरतीसाठी दोन दिवसांची परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेला 48 लाखांहून अधिक उमेदवार बसले आहेत. पहिल्याच दिवशी म्हणजे 17 फेब्रुवारीला अनेक केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. या दरम्यान, कन्नौज जिल्ह्यात एक अॅडमिट कार्ड समोर आले आहे, जे केवळ यूपीमध्येच नाही तर देशभरात चर्चेत विषय ठरले आहे.

प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सनी लिओनीच्या नावाने पोलीस भरती परीक्षेत एक फॉर्म भरण्यात आला होता. इतकेच नाही तर कन्नौजला ॲडमिट कार्डमध्ये (Actress Sunny Leone Admit Card) परीक्षेचे केंद्रही वाटप करण्यात आले. हे प्रवेशपत्र पाहून पोलीस अधिकारीही हैराण झाले आहेत. पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे हे प्रवेशपत्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सनी लिओनीच्या नावाने हा फॉर्म भरण्यात आला होता. ॲडमिट कार्डमध्ये सनी लिओनीचा फोटोही आहे. या फॉर्ममध्ये पत्रव्यवहारासाठी एक पत्ता मुंबई आणि एक पत्ता कासगंज आहे. या प्रवेशपत्रामध्ये पिन कोड 210423 दर्शविला आहे. वडिलांचे नाव JORJGI आणि आईचे नाव DARMI असे लिहिले आहे. आधार क्रमांक 351334673887 भरला आहे.

फॉर्मसोबतच सनी लिओनीच्या नावाने नोंदणी क्रमांक 12258574 असलेले पोलीस भरती परीक्षेचे प्रवेशपत्रही व्हायरल होत आहे. या प्रवेशपत्रावर परीक्षेचे केंद्र सोन श्री स्मारक बालिका महाविद्यालय, मंडी बाजार तिरवा कन्नौज पिन कोड 209732 असे लिहिलेले आहे. परीक्षा कोड 51010 दर्शविला आहे. हे प्रवेशपत्र पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. असे कृत्य करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. असं कन्नौजमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.